कोणाचीही नोकरी जाणार नाही : ममता   

कोलकाता : मी जिवंत असेपर्यंत कोणताही शिक्षक आपली नोकरी गमावणार नाही, अशी ग्वाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी दिले. कोणत्याही किंमतीत शिक्षकांच्या नोकर्‍या वाचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही त्या म्हणाल्या.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने माझे मन खूप दुःखी आहे. मी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध बोलत आहे. तुरुंगवासही होऊ शकतो. कोणी मला आव्हान दिले तर मला कसे उत्तर द्यायचे हे माहीत आहे. मी कोणालाही पात्र उमेदवारांकडून नोकर्‍या हिसकावू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच, पीडित शिक्षक आणि कर्मचार्‍यांना आपापल्या शाळेत परत जाण्याचे आणि कामकाज सुरू करण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाने ३ एप्रिल रोजी बंगालमधील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील २५,७५३ शिक्षक आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती अवैध ठरवली होती. या सर्वांची २०१६ मध्ये राज्य शाळा सेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली होती. याविरोधात १२५ अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आले होते. 

Related Articles